🎵

Atasha Ase He

Album: Best of Sandeep - Salil, Vol. 2 Durasi: 5:00

आताशा. असे हे. मला काय होते

कुण्या काळचे, पाणी डोळ्यात येते...

बरा बोलता बोलता, स्तब्ध होतो...

कशी शांतता, शून्य शब्दांत येते...

कधी दाटू येता, पसारा घनांचा...

कसा सावळा रंग, होतो मनाचा...

असे हालते आत हळूवार काही...

जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा...

असा ऐकू येतो, क्षणाचा इशारा ...

क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा...

नभातून ज्या रोज जातो बुडूनी.

नभाशीच त्या मागू जातो किनारा...

न अंदाज कुठले न अवधान काही...

कुठे जायचे, यायचे भान नाही.

जसा गंध निघतो, हवेच्या प्रवासा

न कुठले नकाशे न अनुमान काही...

कशी ही अवस्था कुणाला कळावे.

कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...

किती खोल जातो, तरी तोल जातो...

असा तोल जाता कुणी सावरावे...