सांग सख्या रे
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?

सांग सख्या रे, अजून का डोळ्यांतुन तिचिया झुलते अंबर?

सांग अजुनही निजेभोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
सांग अजूनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी?
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?
फुले स्पर्शता येते का रे अजून बोटांमधुनी थरथर?
तिच्या स्वरांनी होते का रे सांज अवेळी अजून कातर?
अजूनही ती घुमते का रे?
अजूनही ती घुमते का रे वेळूमधल्या धुंद शिळेपरी?
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?
वयास वळणावर नेणारा घाट तिचा तो अजून का रे?
सलज्ज हिरव्या कविते जैसा थाट तिचा तो अजून का रे?
अजून का ती जाळत जाते?
अजून का ती जाळत जाते रान कोवळे जणू वणव्यापरी?
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?
सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळूपरी

आणिक उमटुन गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी
तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोरपिसापरी?
सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?
अता बोलणे आणि वागणे यातील फरकाइतुके अंतर पडले
तरिही जाणवते मज कवितेमधुनी तिचीच थरथर
सांग तिला मी आठवतो का?
सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी?