🎵

Bagh ughaduni dar

Album: Roopkumar Rathod Durasi: 4:42
[00:15.95]शोधून शिणला जीव आता रे
[00:19.70]साद तुला ही पोचंल का
[00:23.47]दारोदारी हुडकंल भारी
[00:27.39]थांग तुझा कधी लागंल का
[00:31.29]शाममुरारी, कुंजविहारी
[00:35.10]तो शिरीहारी भेटंल का?
[00:39.04]वाट मला त्या गाभाऱ्याची
[00:42.77]आज कुणी तरी दावंल का?
[00:46.37](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[00:52.16](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[00:58.16]🎵
[01:41.21]तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
[01:44.95]नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
[01:48.82]तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
[01:52.68]शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो
[01:56.62]रोज वृंदावनी फोडी जो घागरी
[02:00.25]तोच नाथा घरी वाहातो कावडी
[02:04.28]गुंतला ना कधी मंदिरी, राउळी
[02:08.04]बाप झाला कधी जाहला माऊली
[02:12.19]भाव भोळा जिथे धावला तो तिथे
[02:15.96]भाव नाही तिथे सांग धावंल का?
[02:20.17](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[02:25.72](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[02:31.82]🎵
[03:18.48]राहतो माउलीच्या जीव्हारात जो
[03:22.37]डोलतो मातलेल्या शिवारात तो
[03:26.40]जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
[03:30.12]दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
[03:34.00]नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
[03:37.83]होई काठी कधी आंधळ्याच्या करी
[03:41.90]घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
[03:45.67]तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
[03:49.63]राहतो तो मनी, या जनी जीवनी
[03:53.53]एका पाषाणी तो सांग मावंल का
[03:57.76](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:03.30](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:09.01](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:14.95](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:20.71](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:26.64](बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?)
[04:36.13]🎵