← Kembali
🎵

Kheltana Rang Bai Holicha

Album: Top 13 Marathi Danaka Durasi: 3:23

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

फाटला गं, कोणा माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या गं पोरी, जमलो गावा बाहेरी

सख्याची आली स्वारी, उडविली ती पिचकारी

घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा

फाटला ग, कोणा माझ्या चोळीचा

झणी पाऊल अवघडलं,आणि काळीज धडधडलं

काय सांगु मी पुढलं, क्षणातच सारं घडलं

जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा

फाटला ग कोणा माझ्या चोळीचा

मला काही समजंना, मला काही उमजंना

त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना

डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा

फाटला गं, कोणा माझ्या चोळीचा