🎵

Mi Morcha Nela

Album: Ayushyawar Bolu Kahi (feat. Salil Kulkarni) Durasi: 4:34
[00:00.36]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[00:05.51]मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
[00:11.09]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[00:16.27]मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
[00:21.58]मी मोर्चा नेला नाही
[00:24.49]🎵
[00:34.97]भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
[00:40.13]भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
[00:46.13]कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
[00:50.78]कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
[00:56.36]मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
[01:01.55]मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
[01:06.77]तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही
[01:12.22]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[01:17.46]मी मोर्चा नेला नाही
[01:20.40]🎵
[01:33.79]नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
[01:38.87]नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
[01:44.15]पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
[01:49.43]पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
[01:54.84]पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
[02:00.11]पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
[02:05.49]कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
[02:10.74]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[02:16.19]मी मोर्चा नेला नाही
[02:19.09]🎵
[02:29.53]धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
[02:34.88]धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
[02:40.11]टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
[02:45.57]टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
[02:50.85]मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
[02:56.36]मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
[03:01.42]मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही
[03:06.76]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[03:12.04]मी मोर्चा नेला नाही
[03:17.42]मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
[03:22.85]मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
[03:28.10]मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
[03:33.41]मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
[03:38.72]मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
[03:44.13]मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
[03:49.44]मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही
[03:54.59]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[04:00.08]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[04:05.67]मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
[04:10.66]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[04:16.00]मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
[04:21.23]मी मोर्चा नेला नाही, संपही केला नाही
[04:27.35]🎵