← Kembali
🎵

Sur Magu Tula Mi Kasa

Album: Kavi Gaurav Suresh Bhat Durasi: 2:44

सूर मागू तुला मी कसा?

जीवना तू तसा, मी असा

सूर मागू तुला मी कसा?

जीवना तू तसा, मी असा

तू मला, मी तुला...

तू मला, मी तुला पाहिले

एकमेकांस न्याहाळीले

दुःख माझा, तुझा आरसा

दुःख माझा, तुझा आरसा

जीवना तू तसा, मी असा

एकदाही मनासारखा

तू न झालास माझा सखा

एकदाही मनासारखा

तू न झालास माझा सखा

खेळलो खेळ झाला जसा

खेळलो खेळ झाला जसा

जीवना तू तसा, मी असा

सूर मागू...

सूर मागू तुला मी कसा?

जीवना तू तसा, मी असा