← Kembali
🎵

Tujhya Patangachi Dori

Album: Dhakti Sun Durasi: 4:21

फसलीस सांग पोरी, तू गं कशी? तू गं कशी?

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

ए-हे, फसलीस सांग पोरी, तू गं कशी? तू गं कशी?

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

रुपाच्याच तोऱ्यामध्ये होतीस तू

होतास तू रे, होतास तू

हो, आपल्याच मस्तीमध्ये होतास तू

ओ-हो, होतीस तू गं, होतीस तू

तुझा तोरा, माझी मस्ती...

तुझा तोरा, माझी मस्ती अशी गेली कशी?

तुझा तोरा, माझी मस्ती अशी गेली कशी?

अरे, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

नादी लावा याचा होता छंद तुझा

छंद तुझा रे, छंद तुझा

हो, माग-माग फिरायाचा नाद तुझा

नाद तुझा गं, नाद तुझा

खोड तुझी, हौस माझी...

खोड तुझी, हौस माझी अशी फिटली कशी?

खोड तुझी, हौस माझी अशी फिटली कशी?

अगं, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

कोणी कोणा जिंकीयलं? हरलं गं कोण?

सावज कोण? आणि पारधी कोण?

सांग कोणी कोणा जिंकीयलं? हरलं गं कोण?

सावज कोण? आणि पारधी कोण?

गवसलू एकमेका...

गवसलू एकमेका कसे जाळ्यानीशी

गवसलू एकमेका कसे जाळ्यानीशी

पतंगाची दोरी अशी कटली जशी

पतंगाची दोरी अशी कटली जशी

फसलीस सांग पोरी, तू गं कशी? तू गं कशी?

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी

तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी