🎵
Utha Utha Ho Sakalik
Album: Golden Hour Lata Mangeshkar - Devotional
Durasi: 3:26
उठा-उठा हो सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
रिद्धी-सिद्धिचा नायक
सुखदायक भक्तासी
उठा-उठा हो सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
अंगी शेंदुराची उटी
माथा शोभतसे किरीटी
केशर कस्तूरी लल्लाटी
हार कंठी साजिरा
उठा-उठा हो सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
कानी कुंडलांची प्रभा
सूर्य-चंद्र जैसे नभा
कानी कुंडलांची प्रभा
सूर्य-चंद्र जैसे नभा
माजी नागबंदी शोभा
स्मरता उभा जवळी तो
उठा-उठा हो सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
कांसे पीतांबराची धटी
हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरता कंठी
तो संकटी पावतो
उठा-उठा हो सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
वाचे स्मरावा गजमुख